भाजप महिला सदस्या,इंटरनॅशनल ह्युमन राईट्स या संघटनेच्या महिला सदस्या, सौ प्रीती प्रदीप वाडेकर यांचे निधन

देवगड, दि.११ मार्च
देवगड येथील भाजप महिला सदस्या देवगड तालुका इंटरनॅशनल ह्युमन राईट्स या संघटनेच्या महिला सदस्या, सौ प्रीती प्रदीप वाडेकर यांचे वयाच्या (४४)व्या वर्षी रविवारी रात्री अल्पशा आजाराने आकस्मिक दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पती सासू,मुलगा असा परिवार आहे.देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या त्या महिला सदस्या होत्या.वाडा गावच्या माजी सरपंच म्हणून त्यांनी सेवा बजावली होती.मनमिळावू स्वभाव व सामाजिक राजकीय उपक्रमात सहभागी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या.
देवगड प.स.अंतर्गत यांत्रिकी विभागात कर्मचारी पदी कार्यरत असलेले प्रदीप वाडेकर यांच्या त्या पत्नी होत.