कोळंब येथे २२ रोजी विविध कार्यक्रम

मालवण,दि.१४ जानेवारी

अयोध्या नगरीत होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या (रामलल्ला) मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या अलौकिक तथा ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या, उत्तरप्रदेश यांच्या आवाहनानुसार दि. २२ जानेवारी रोजी कोळंब येथील नाटेकर आजी महापुरुष पार, कोळंब येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वा. श्रीराम प्रतिमा पूजन, १०.१५ वा. रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा, ११ वा. गायन, ११.३० वा. कीर्तनकार शेवडेबाईंचे प्रवचन, दुपारी १२.३० वा. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ जप (१०८ वेळा), १२.३७ वा. महाआरती, १ वा. महाभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त कोळंब ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.