बी एस बांदेकर कला महाविद्यालय सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत रिया जेवरे हिने प्रथम क्रमांक पटकावला

सावंतवाडी दि.११ मार्च 
बी एस बांदेकर कला महाविद्यालय सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून शालेय गटात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत प्रथम रिया अमोल जेवरे या मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
इयत्ता पहिली ते चौथी या गटात द्वितीय क्रमांक सर्वेश दिनेश मेस्त्री न्यू शिवाजी प्रीमियर स्कूल जांभवडे, तृतीय क्रमांक आराध्या नितीन सातवसे सेंट ऊर्सुला कणकवली, उत्तेजनार्थ हेत फर्नांडिस स्टेपिंग ग्लोबल स्कूल कोलगाव. तसेच इयत्ता पाचवी ते सातवी गटात वेणू अजित सामंत कळसूकर इंग्लिश स्कूल, द्वितीय अनुश्री अभिजीत राणे एस एम हायस्कूल कणकवली, तृतीय मोहित नीलकंठ सुतार विद्यामंदिर कणकवली, उत्तेजनार्थ तन्वी प्रसाद दळवी आरपीडी हायस्कूल तसेच इयत्ता आठवी ते बारावी गटात प्रथम ओंकार धनंजय जाधव लक्ष्मीनारायण बिबवणे, द्वितीय तानिया वासुदेव सावंत मिलाग्रीस हायस्कूल, तृतीय सन्मिता संदीप दाभोळकर मिलाग्रीस हायस्कूल,उत्तेजनार्थ आर्या विनोद चौगुले सेठ एमजी स्कूल देवगड यांनी क्रमांक पटकावले आहेत.
खुला गटांमध्ये प्रथम कुणाल प्रशांत हरमलकर आरपीडी हायस्कूल, द्वितीय दिनेश लवू मेस्त्री न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे, तृतीय केदार सखाराम टेमकर कळसुलकर इंग्लिश स्कूल तर उत्तेजनार्थ आदेश चौकेकर शिरगाव देवगड यांनी क्रमांक पटकावले आहेत.
या चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातून ४६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३०० विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या अंतिम फेरीनंतर याबाबतची पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य प्रकाश पेठे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. टी एल नाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सिद्धेश नेरूरकर व आभार प्रदर्शन प्रा. तुकाराम मोरजकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.