दांडी येथे २० मार्च रोजी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

मालवण,दि.११ मार्च

मालवण दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर येथे बाल दांडेश्वर मंडळातर्फे राज्यस्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि. २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १०,००० रू., ५००० रू., २५०० रू., १५०० रू., तसेच उत्तेजनार्थ १००० रू. ची दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी यतीन आचरेकर ८४५९०२१०३३, सुयोग परब ७०८३१४७६७१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.