कांदळगाव रामेश्वर मंदिरात २२ रोजी कार्यक्रम

मालवण,दि.१४ जानेवारी

अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात होणाऱ्या श्री राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्या आवाहनानुसार कांदळगाव येथील स्वंयभू श्री रामेश्वर मंदिरात दि. २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्रीच्या चरणी अभिषेक, सकाळी १० पासून अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, सकाळी ११ वाजता श्री रामरक्षा, मारुती स्त्रोत, जप, आदीचे पठण, दुपारी १२.३० वाजता आरती व महाप्रसाद, दुपारी हळदीकुंकू, सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, भजने, रात्री १० वा. माजी खासदार नीलेश राणे पुरस्कृत खानोलकर दशावतारी नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ आणि कांदळगाव ग्रामस्थांनी केले आहे.