आचरा,दि.११ मार्च (अर्जुन बापर्डेकर)
पंचक्रोशीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व जिल्हा व्यंग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग अध्यक्ष अनिल शिंगाडे, शामसुंदर लोट,जेष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, जेएस फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, महेंद्र घाडी,पंकज आचरेकर, चंदू कदम,योगेश गांवकर,अनुष्का गांवकर, किशोरी आचरेकर,हर्षदा पुजारे,शृती सावंत,पुर्वा तारी,सारीका तांडेल यांसह अवधूत हळदणकर, जयप्रकाश परुळेकर,सचिन हडकर,ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. मांगल्य मंगल कार्यालय आचरा येथे आयोजित या शिबीरात दिव्यांगाची सर्व प्रकारचीस तपासणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठांची नेत्र व रक्त तपासणी केली गेली. या शिबीरात जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व न्युरोसिनॅपिक कम्युनिकेशन कंपनी बंगलोर अत्याधुनिक हेल्थ केअर सेंटर टेलीमेडीसीन सिंधुदुर्ग आणि विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Home आपलं सिंधुदुर्ग आचरा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद