रामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ वैष्णवी सावरे

आचरा,दि.१२ मार्च (अर्जुन बापर्डेकर)

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा ने जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर आयोजित केलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत सौ वैष्णवी सावरे होममिनिस्टर ठरल्या तर उपविजेत्या सौ संस्कृती पेडणेकर यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले.त्यांना- सौ. सीमा गावडे (स्वामी रामेश्वर जेनेरीक मेडिकल,आचरा) ,, सौ.गौरी जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्तेसंस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी उर्मिला सांबारी,श्रीमती वैशाली सांबारी, दिपाली कावले,भिकाजी कदम यांसह सांस्कृतिक समिती सदस्य कर्मचारी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रत्येक फेरीसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. ती सौ.उर्मिला सांबारी,सौ.सई राणे(कुलसूम नर्सरी, आचरा), सौ. स्मिता परब, श्रीम.वैशाली सांबारी, श्रीम.शोभा सुखटणकर, सौ.नेहा नलावडे,श्रीम.नेहा घाडी, सौ.स्वाती पेडणेकर(समर्थ काजू उद्योग, आचरा), सौ.सुमित्रा गुरव, सौ. सीमा घुटुकडे, सौ.गीता खेडेकर, सौ.स्नेहा कारेकर, सौ.मनाली राणे(श्री. दिलीप सावंत -हुद्देदार यांचे स्मरणार्थ), माजी सरपंच.प्रणया टेमकर(सी कॅफे आचरा), सौ.अस्मिता गवस,सावंतवाडी,सौ.मानसी राणे,सौ.आशा हजारे यांनी पुरस्कृत केल्या होत्या.यावेळी राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेत्या महिलांचाही संस्थेतर्फे गौरव करण्यात आला होता.
स्पर्धेचे सूत्रसंचालन – सौ.भावना मुणगेकर, सौ.विनिता कांबळी, सौ.वर्षा सांबारी यांनी केले. तर आभार – सौ.कामिनी ढेकणे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीच्या सौ श्रद्धा महाजनी, विलास आचरेकर, रुपेश साटम,यांसह सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले.