पळसंब क्रिकेट स्पर्धेत खामदेव स्ट्राईक इन्सुली विजेता

आचरा,दि.१२ मार्च (अर्जुन बापर्डेकर)
पळसंब येथे सरपंच महेश वरक मित्र मंडळा तर्फे आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत बंड्या स्पोर्ट मसुरेवर मात करत खामदेव स्ट्राईक इन्सुलीने विजेतेपद पटकावले. त्यांना पळसंब सरपंच महेश वरक यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक रुपये एक लाख व सरपंच चषक देवून गौरविण्यात आले.उपविजेत्या बंड्या स्पोर्ट मसुरे संघाला 50 हजार व सरपंच चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी अशोक जुवेकर ,सुहास सावंत, बबलू सावंत ,बाबू चव्हाण, महेश वायगणकर ,अजित पुजारे ,सुधीर माने, अक्षय परब ,अरुण माने, अनिल पुजारे, बबन पुजारे ,विजय सावंत, मधुकर कदम, पुरुषोत्तम साईल, मोहन आपकर, बाबू सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत यथार्थ इलेव्हन आचराने तृतीय क्रमांक पटकावला तर चतुर्थ क्रमांक अवधूत स्पोर्टस ने पटकावला.त्यांना रुपये 15000 व सरपंच चषक देवून गौरविण्यात आले.या स्पर्धेदरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी भेट देवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले होते.यावेळी त्यांच्या सोबत तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,राजन गांवकर,चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, महेश मांजरेकर यांसह अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.