राज्याकडून प्रस्ताव गेलास केंद्रात तो मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर आम्ही दबाव टाकू-खास.विनायक राऊत

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार राऊत यांना दिले निवेदन

सावंतवाडी,दि.१४ जानेवारी
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जागरूक असून या प्रश्नाचे आपणास जाणीव आहे त्यामुळे सातत्याने या प्रश्न केंद्र सरकारकडे पाठिंबा पाठपुरावा करत आहे आता राज्य सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे जोपर्यंत राज्य शासन केंद्र सरकारकडे कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलीन करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही राज्याकडून प्रस्ताव गेलास केंद्रात तो मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर आम्ही दबाव टाकू अशी आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी चे खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले

जसे बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव सिंधुदुर्ग विमानतळासाठी मागणी केली तशीच प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ची मागणी आपण केंद्राकडे केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला हवा यासाठी राज्य सरकारवर दबाव टाका आपण तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचे आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आज खा राऊत यांना या शिष्टमंडळाने अॅड संदीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, तेजस पोयेकर आदींनी भेट देऊन निवेदन सादर केले.यावेळी 26 जानेवारी होणाऱ्या आंदोलनात आमचे शिवसैनिक सहभागी होतील असेही आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी
तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते
शराज्य शासनाकडून मंत्रिमंडळात मंजूर करून सावंतवाडी टर्मिनस चे प्रस्ताव केंद्रात पाठवा ते मंजूर करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे आश्वासन खासदार राऊत यांनी या शिष्टमंडळाला दिले यासाठी येथील केंद्रीय मंत्री आणि राज्यातील पालकमंत्री व मंत्री यांच्यावर दबाव टाका आणि हे प्रस्ताव तातडीने पाठवा असे ते म्हणाले तर राज्य शासनालाही आम्ही निवेदन दिलेले आहे सध्याचे राज्य सरकारतील मुख्यमंत्री व ज्ञान मंत्र्यांना आम्ही भेटणार नाही मात्र संसदेत हा प्रस्ताव आल्यास त्याला मंजुरी मिळण्याकरिता सर्व खासदार एकत्र येऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ असे ते म्हणाले
या प्रश्नासाठी आपण केंद्रातील येथील मंत्री आणि राज्यातील मंत्री यांच्याकडे हा प्रश्न दिला त्यांनी तो मांडला काय ? असा सवाल खासदार राऊत यांनी करून केंद्रीय मंत्री नारायण राणे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला केला.
मात्र हा प्रश्न आपण सातत्याने संसदेत उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले तुम्ही न सांगता सुद्धा हा प्रश्न आपण लावून धरत असल्याचे ते म्हणाले.
कोकण रेल्वेचा प्रश्न सोडवायचा असेल तर कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये मर्ज होण्याची गरज आहे विलीनीकरण करण्याची गरज आहे आणि कोकण रेल्वे जेव्हा भारतीय रेल्वे विलीनीकरण होईल त्यावेळी कोकण रेल्वे हा स्वतंत्र झोन ठेवून भारतीय रेल्वेत असावा अशा पद्धतीची मागणी आपण केली असल्याचे ते म्हणाले
केवळ मंत्र्यांनाच भेटूनच केली असे नाही तर संसदेची आयुधे वापरून ही मागणी केलेली आहे थ्री सेवन सेवन अन्वये तसेच शून्य प्रवाहामध्ये ही मागणी केलेली आहे या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सुदैवाने सकारात्मक
प्रतिसाद देत आहेत तसेच आम्ही आमची रेल्वे कर्मचारी संघटना यांच्याशी चर्चा केली आहे त्यांना भारतीय रेल्वेत स्वतंत्र कोकण रेल्वे झोन हवा आहे त्यासाठी ही रेल्वेमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे
या प्रस्तावाला गोवा राज्यासह कर्नाटक सरकारने प्रतिसाद दिला मात्र महाराष्ट्र सरकारने अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही जोपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत या कोकण रेल्वेसाठी आवश्यक असलेला निधी मिळू शकणार नाही ह्या निधीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्याची गरज आहे.तसे झाल्यास मूळ केंद्रीय बजेटचा हिस्सा कोकण रेल्वेच्या विकासासाठी मिळू शकतो
कोकण रेल्वेला गेल्या वर्षी दोन कोटीचा फायदा झालेला आहे परंतु भारतीय रेल्वेचा निधी मिळाल्याशिवाय कोकण रेल्वे चा टर्मिनल चा प्रश्न सुटणार नाही असे ते म्हणाले
रेल्वे थांब्याबाबतचा प्रश्न राहिला असून आपण स्वतः पाठपुरावा करून सिंधुदुर्गाच्या चार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकाला जोडणारे रस्ते राज्य शासनाने तयार करावेत अशी मागणी सर्व प्रथम केली असल्याचे ते म्हणाले
महाविकास आघाडीतील तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत असताना ही मागणी त्यावेळी केली होती त्यांच्याकडून कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दरम्यान एक करार करण्यात आला होता त्यामुळे हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारवर कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करा यासाठी दबाव टाकत आहोत तुम्हीही प्रवासी संघटना म्हणून तसा दबाव टाका असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले
केंद्रीय रेल्वेमंत्री विलीनीकरणासाठी सकारात्मक आहेत सावंतवाडी रेल्वे टर्मिनस तसेच रेल्वे लोहमार्ग डब्लिंग करणे यासाठी 35 हजार कोटी रुपयांची गरज आहे त्यावेळी 29 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव होता मात्र त्यामध्ये आता वाढ झाली आहे रेल्वे लोहमार्गाचे डब्लिंग केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही डब्लिंग साठी 35000 कोटी नाही तर वीस हजार कोटी रुपये जरी दिले तरी हा प्रश्न काही अंशी सुटणार आहे ही रक्कम केंद्र सरकारकडून एकरकमी मिळायला हवी तर आपण प्रवासी संघटना म्हणून आंदोलन करा मात्र राज्य सरकारवर दबाव टाकून रेल्वे मध्ये विलीनीकरण करा करण्याची मागणी लावून धरा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन खासदार राऊत यांनी यावेळी बोलताना दिले राज्य सरकारकडून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि अधिकाऱ्यांची चोचले पुरवले जात असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.
लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा हॉल्ट हे प्रश्न आपण सातत्याने सोडवत आलो आहे ज्या गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकात यापूर्वी थांबत होत्या त्या गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत आपण रेल्वे मंत्राची चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले यात बेंगलोर एक्सप्रेस, मडगाव नागपूर हॉलिडे स्पेशल, राजधानी एक्सप्रेस या गाड्यांना सावंतवाडी थांबा मिळावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने खासदार राऊत यांच्याकडे करण्यात आली यावेळी लेखी निवेदन त्यांना सादर करण्यात आले