ग्रामपंचायत तळवडे च्या वतीने महिला दिन उत्साहात

देवगड,दि.१२ मार्च
ग्रामपंचायत तळवडे च्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे उदघाटन तळवडे सरपंच गोपाळ रूमडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाले .
याप्रसंगी तळवडे ग्रामसेवक गुणवंत पाटील , उपसरपंच भाग्यश्री धुरी , ग्रामपंचायत सदस्या माणसी माणगांवकर , भावना शिंगरे , सुजाता घाडी , पल्लवी झाजम , आरोग्य सेविका रिध्दी तावडे, प्राजक्ता भाटकर, किशोर तळवडेकर , जयेश जाधव , अंगणवाडी सेविका शोभा कुबडे, संगिता मुणगेकर , ललिता दुखंडे , श्रीमती साटम , तंटामुक्ती अध्यक्षा रिया अनभवणे , बचत गट प्रतिनिधी नंदीनी परब तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .
यावेळी महिला दिनानिमित्त सरपंच गोपाळ रुमडे, ग्रामपंचायत सदस्या माणसी माणगांवकर, उपसरपंच भाग्यश्री धुरी आदींनी मार्गदर्शन करत महिला दिनांच्या शुभेच्छा दिल्या या नंतर हळदीकुंकु व त्यानंतर महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी फनी गेम स्पर्धा त्यामध्ये मेणबत्ती पेटवणे , टीकली लावणे व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक विदिशा खोत , द्वितीय क्रमांक रेश्मा लाड तर तृतीय क्रमांक पुजा धुरी हिने पटकावला . या स्पधेत ग्रामपंचायत सदस्या भावना शिगरे यांनी निवेदन केले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक गुणवंत पाटील तर आभार उपसरपंच भाग्यश्री धुरी हिने मानले .