आत्मविश्वास अंगी असला की जीवनात यशस्वी होता येते-लक्ष्मी पेडणेकर

मसुरे येथे क्रूसविर विकास केंद्र या संस्थेच्या वतीने महिला दिन संपन्न……

मसुरे,दि.१२ मार्च

आत्मविश्वास अंगी असला की जीवनात यशस्वी होता येते. म्हणूनच आज महिलांनी आपल्या अंगी आत्मविश्वास बाळगला पाहिजे. आज सर्वत्र पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात महिला पुढे येत आहेत हे कौतुकास्पद आहे. याबरोबरच महिलांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन
आपली आर्थिक उन्नती साधण्याचाही प्रयत्न करणे आज गरजेचे आहे असे प्रतिपादन मसुरे देऊळवाडा येथे महिला दिनी बोलताना मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सांगितले.
मसुरे देऊळवाडा ख्रिस्तवाडी येथे कृसविर विकास केंद्र मसुरे या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन मंगळवारी विविध उपक्रमाने शैलेजा कातवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी देऊळवाडा उपसरपंच नरेंद्र सावंत, धर्मगुरू मसुरे फादर गिल्बर्ट कोलासो, संस्थेच्या संचालिका सिस्टर फातिमा फर्नांडिस, आहार तज्ञ डॉक्टर गार्गी ओरसकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सौ स्वरा प्रभू गावकर, सिस्टर एग्नेस डिसोजा, संस्थेच्या अॅनीमेटर
सौ नेहा नाईक, सौ प्रिया कातवणकर, आयवन फर्नांडिस आणि मसुरे परिसरातील गावातील विविध बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर गार्गी ओरोस्कर यांनी महिलांच्या आणि मुलांच्या आरोग्य विषय आणि संतुलित आहाराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मगुरू फादर गिल्बर्ट कोलासो बोलताना म्हणालेत महिलांनी आज सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे. क्रूसवीर विकास केंद्र मसुरे ही संस्था नेहमीच महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असते. आजच्या या महिलादिनी या संस्थेने केलेले उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी महिला बचत गट यांच्या विविध योजना तसेच बचत गटाच्या माध्यमातून करावयाचे छोटे मोठे उद्योग आणि महिला सबलीकरण यावरती मार्गदर्शन केले. या संस्थेच्या अध्यक्षा शलेजा कातवणकर यांनी संस्थेच्या ध्येय धोरणा विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम संपन्न झाले. विविध क्षेत्रातील महिलांचा आणि मान्यवरांचा कृषी विकास केंद्र मसूरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मसुरे परिसरातील गावातील विविध महिला बचत गट, बचत गटांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला लोकप्रतिनिधी,स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रिया कातवणकर यांनी आणि आभार सौ नेहा नाईक यांनी मानले.