सावित्रीबाईंची प्रेरणा आणि संघर्ष पुढे न्या – मंगल परूळेकर

वेंगुर्ला, दि.१२ मार्च

समताधिष्ठीत समाज निर्मिती हे आपल्या घटनेचे ध्येय आहे आणि असा समाज निर्माण करण्याचे सामर्थ्य सावित्रीबाईंच्या विचारात, तिच्या कार्यात आहे. सावित्रीबाईंची प्रेरणा आणि त्यांचा संघर्ष पूढे नेणे हिच सावित्रीबाईंच्या विचार आणि कृतीला आदरांजली ठरेल असे मत मुक्तांगणच्या मार्गदर्शक मंगल परूळेकर यांनी व्यक्त केले.

येथील मुक्तांगण महिला मंचातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाईंचे जीवनकार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवून नविन पिढीस प्रेरणा मिळावी यासाठी ‘देणे सावित्रीचे‘ हा उपक्रम घेण्यात आला. यात माधवी मातोंडकर, रूपा शिरसाट, साक्षी वेंगुर्लेकर, दिव्या आजगांवकर, दिपा मालवणकर, स्वाती बांदेकर, संजना तेंडोलकर यांनी माझ्या जीवनातील सावित्रीबाईंचे स्थान यावर चर्चा केली. सावित्रीबाईंच्या ओवीने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माधवी मातोंडकर यांनी विशेष सहकार्य केले.