कणकवली दि.१२ मार्च(भगवान लोके)
कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी पदी विशाल खत्री यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला आहे. विशाल खत्री यांनी देवगड तहसीलदार आणि कुडाळ प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे.
कणकवली न.पं मुख्याधिकारी विनोद तावडे यांची बदली झाल्यानंतर वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे पदभार देण्यात आला होता.आता कणकवली नगरपंचायत ला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाले आहेत.त्यामुळे प्रशासकीय राजवटीत गतिमान कारभार होण्यासाठी मदत होणार आहे.