तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न
तळेरे,दि.१४ जानेवारी
प्रत्येक माणूस समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि म्हणूनच यशाची शिखरे गाठत असतांना देखील सुसंस्कारित जीवन जगत निराधारांना जीवन आनंद देणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे आणि ते आपण प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे,असे प्रतिपादन पणदूर येथील संविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनी कार्यक्रमात बोलताना केले.ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
प्रशालेचे संगीत शिक्षक अजित गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन,स्वागत गीत,संस्थागीत,सुमधुर आवाजात गायन केले.दीपप्रज्वलन व सरस्वतीमाता,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस तसेच वामनराव महाडिक (आप्पा)
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कासार्डे विकास मंडळ मुंबई संचलित,कासार्डे माध्यमिक विद्या.कासार्डेचे माजी अध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,ज्यांच्या दातृत्व भावनेतून प्रशालेला संस्कृतिक सभागृह लाभलेला आहे असे डॉ.एम.डी.देसाई, पंचायत स.कणकवलीचे माजी सभापती दिलीप तळेकर,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,उपसरपंच शैलेश सुर्वे,उद्योजक नामदेव बांदिवडेकर,पोलीस पाटील- संजय बिळस्कर,शाळा स.सदस्य शरद वायंगणकर, प्रवीण वरूणकर,संतोष जठार, निलेश सोरप,प्राचार्य अविनाश मांजरेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,ग्राम पं.सदस्य संदीप घाडी,सचिन पिसे,जमीन देणगीदार मोहन खानविलकर, दिनेश मुद्रस,मारुती वळंजु, कराटे शिक्षिका आर्या राऊत,मोहन भोगले,राजेश जाधव,अरविंद कुडतरकर,पालक,ग्रामस्थ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला वाव देत दरवर्षी नंदादीप तयार केला जातो,त्याचेही प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.प्रशालेच्या शैक्षणिक उपक्रमांवर प्रकाश टाकणारा अहवाल याचे वाचन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान प्रशालेच्या शिक्षिका सुर्वे यांना उपक्रमशील शिक्षका म्हणून गौरविण्यात आले.अध्यक्ष संदीप परब यांच्या कार्याला सलाम म्हणून तसेच डॉ. एम.डी.देसाई,प्रभाकर कुडतरकर,प्रवीण वरूणकर, नामदेव बांदिवडेकर,मारुती वळंजु यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
व्यक्तीच्या अवतीभवतीच्या समाजावरून त्याची ओळख ठरत असते,म्हणूनच चांगल्या व्यक्तींच्या सहवासात रहा आणि महाराष्ट्राची यशोगाथा अभ्यासा असे मनोगत प्रभाकर कुडतरतर कर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत आप्पांच्या स्वप्नातील उंच इमारतीचे अस्तित्वात रूपांतरण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात असे उद्गार शाळा स.सदस्य शरद वायंगणकर यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कला-क्रीडा-ज्ञान या सर्वच क्षेत्रात यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा दिवस म्हणजे बक्षीस वितरण, तळेरे ग्रामस्थांच्या दातृत्व भावनेतून आणि अप्पांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या या वास्तूमध्ये ग्रामीण भागातील मुले शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत आहेत.प्रशालेतील प्रत्येक घटक हा शाळा ही माझी जबाबदारी आहे या भावनेने प्रयत्न करत आहे,असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी अगदी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका एस.यु.सुर्वे, प्राध्यापिका एन.पी.गावठे,आर.आर.जाधव तर शेवटी आभार सहा.शिक्षिका डी.सी.तळेकर यांनी मानले.
इन्सेट
यावर्षीच्या विज्ञान नाटोत्सवामध्ये सहभागी होऊन विभाग स्तरापर्यंत प्रशालेचे नाव उज्वल करण्याकरता योगदान दिल्याबद्दल तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल,अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल एक उपक्रमशील शिक्षका म्हणून प्रशालेच्या एस.यु.सुर्वे यांना गौरवण्यात आले,तसेच प्रशालेचा क्रीडा पुरस्कार विजेता विद्यार्थी सिद्धार्थ जठार यांने यश संपादन करत प्रशालेचे नाव महाराष्ट्र पर्यंत नेल्याबद्दल प्रशालेच्यावतीने त्याचाही सत्कार करण्यात आला.