सावंतवाडी दि.१२ मार्च
जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथील अन्नातून विषबाधेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांतील पोषण आहाराबाबत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी एक परिपत्रक काढून काळजी घेण्याचे आवाहन केले.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतंर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानीत अंशतः अनुदानीत शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजेनेची प्रभावी अंमलयजावणी करणेसाठी परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत.प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण या योजेनेची प्रभावी अंमलबजावणी करताना अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
शालेय पोषण आहाराबाबत संनियंत्रणाची जबाबदारी शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची आहे.शाळा स्तरापर्यंत तांदूळ धान्यादी माल ताब्यात घेताना सदर माल योग्य दर्जाचा इत्यादी सुस्थितीत असल्याची खात्री करुनच इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन करुन शाळा मुख्याध्यापकांनी पुरवठादाराकडून आवश्यक तेवढाच माल ताब्यात घ्यावा . माल खराब असल्याचे आढळल्यास सदर माल ताब्यात घेऊ नये, या योजनेमध्ये पुरवठादाराने चांगला माल पुरवणे आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी चांगला माल ताब्यात घेणे अशी संयुक्त जवाबदारी आहे. तांदूळ व धान्याची मालाचा दर्जा खराच असल्याचे निदर्शनास आल्यास माल ताब्यात घेऊ नये, करारनाम्यातील तरतुदीनुसार पुरवठेदारास माल बदलून देण्यास सांगावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
योजने अंतर्गत सिलबंद पाकिटात प्राप्त होणारे मीठ व मसाल्याचे पदार्थ हे मुदतीत असल्याची खात्री करूनच ताब्यात घ्यावेत, सीलबंद वस्तूवरील उत्पादनाचा दिनांक (Manufactiromg Date) च समाप्तीचा दिनांक (Expiry Date) तपासण्यात यावा,
शाळेमध्धे पुरवण्यात आलेला तांदूळ, धान्यादी माल सुरक्षितरीत्या साठवून ठेवावा. धान्यादी माल आल्यानंतर तो व्यवस्थित ठेपण्याची कार्यवाही करावी ,अन्न शिजविण्यासाठी नियुक्त केलेल्या यंत्रणेने अन्न शिजविण्यापूर्वी मालाची काळजीपूर्वक साफसफाई करावी, तसेच अन्न शिजविण्यापूर्वी सदर माल चांगला आहे याची खात्री करावी, असे आवाहन केले आहे.
अन्न शिजविण्यासाठी वापरात येणारी भांडी अन्न शिजविण्यापूर्वी व्यवस्थित धुवून घ्यावी, तसेच मुलांनी जेवण घेतल्यानंतर सदर भांडी व्यवस्थित स्वच्छ करुन ठेवावीत, भांडी स्वच्छ करण्याची कार्यवाही अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेने करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकगृहाची स्वच्छतेसाठी नियमित लक्ष द्यावे.भोजनानंतर शाळेच्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जघाबदारी बचतगट / आहार शिजवणान्या पंत्रणेची राहील.विद्यार्थ्यांनाही भोजनापूर्वी हात धुण्याबाबत सकृत सूचना द्याव्यात .मुलांना शालेय पोषण आहार देण्यापूवी अर्धा तास अगोदर आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयंपाकी, नंतर शाळा व्यवस्थापन समिती किंवा त्यांचे प्रतिनिधी व त्यानंतर मुख्याध्यापक/ योजनेची संबंधित शिक्षक या तीन स्तरावर घेवून त्याची नोंद गोंदवहीमध्ये घेण्यात यावी, सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात याचे, प्रत्येक स्तरावर दक्षता घेतल्यास दुर्घटना संभवणार नाही.ग्रामीण तसेच नागरी भागामध्ये मुलांना अन्न खाण्यास देण्यापूर्वी सदर अन्नाचा नमुना (किमान ५० ग्रॅमचंद पर्यंत) तपासणीसाठी बंद डब्यात बाजूला काढून ठेवावा आणि तो एक दिवस जतन करणे आवश्यक आहे.अन्न शिजविणान्या यंत्रणांच्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांची सहा महिन्यांनी एकदा वैद्यकिय तपासणी करण्याची कार्यवाही करावी.प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक रुग्णालय, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा यांचे दूरध्वनी क्रमांक शाळेमध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करावेत. केंद्रप्रमुख यांनी दरमहा शाळा तपासणी करताना वरीलप्रमाणे शाळांकडून कार्यवाही केली जात आहे याचाबत खात्री करावी.प्रधानमंत्रो पोषणशक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकाराची दुर्घटना घडणार नाही याबाबत यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे आणि प्रस्तुत पत्रान्वये दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी केले आहे.