मालवण,दि.१३ मार्च
मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ९ ते ११ एप्रिल या कालावधीत मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
९ रोजी सकाळी ७ वा. लघुरुद्र, दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वा. सातेरी भजन मंडळ, कांदळगाव देऊळवाडीचे बुवा राजेंद्र कोदे यांचे भजन, ७ वा. हनुमान भजन मंडळ, वर्देचे बुवा गुंडू सावंत यांचे भजन, १० रोजी रात्री ९ वा. चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा ‘रक्तांग जन्म’ हा नाट्यप्रयोग, ११ रोजी सायंकाळी ५ वा. महिलांसाठी खास आकर्षण असलेला खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार असून विजेत्या प्रथम क्रमांकास पैठणी, द्वितीय सोन्याची नथ, तृतीय क्रमांकास मिक्सर अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.