मालवण,दि.१३ मार्च
मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील भंडारी हायस्कूल हॉल येथे विविध योजनांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात आधारकार्ड नूतनीकरण, दुरुस्ती, १८ वर्षांखालील व्यक्तींचे नवीन आधारकार्ड बनविणे, आयुष्यमान कार्ड नवीन बनविणे, आभा कार्ड, शेतकरी सन्मान योजना सुधारणा, विश्वकर्मा योजना माहिती व प्रसारण, नवमतदार नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी येताना आधारकार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड जोडलेले बँक खाते बूक, आधारकार्ड व बँकेला जोडलेला मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे. संपर्कासाठी योगेश कांबळे (९८२३४७५९५६), संतोष खराडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.