उपाध्यक्षपदी श्रीमती अनघा तळावडेकर
सावंतवाडी,दि.१४ जानेवारी
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश चव्हाण तर उपाध्यक्षपदी श्रीमती अनघा तळावडेकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सेवानिवृत्तीमुळे भाग्यवंत वाडीकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज जिल्हा उपनिबंधक सहकार कार्यालयाच्या अधिकारी सौ. उर्मिला यादव यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी करीता सर्व संचालकांची सभा आयोजित केली होती. यावेळी अध्यक्षपदा साठी राजेश तानाजी चव्हाण यांचे नाव संचालक दिनेश खवळे यांनी सुचविले तर उपाध्यक्ष पदासाठी श्रीमती अनघा अमित तळावडेकर यांचे नाव सौ. वर्षा मोहिते यांनी सुचविले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकच नाम निर्देशन अर्ज दाखल झाल्याने संस्थेच्या अध्यक्षपदी श्री राजेश तानाजी चव्हाण व उपाध्यक्षपदी श्रीम. अनघा अमित तळावडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री.वासुदेव विश्वनाथ वरवडेकर, संचालक कृष्णा म. आडणेकर, देवीदास ल. आडारकर, दिनेश प. खवळे, बाळकृष्ण तु. रणसिंग, प्रवीण म. सावंत, चेतन सू. गोसावी, विलास मो. चव्हाण, राजेंद्र वि. शिंगाडे व सौ.वर्षा मोहिते उपस्थित होते
संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. वाडीकर यांनी संस्थे साठी केलेल्या कामाचा आदर्श ठेवून संस्थेची जास्तीत जास्त प्रगती होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी सांगितले. संस्थेचे सचिव निलेश कुडाळकर यांनी उपस्थित सर्व संचालकांचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना माजी अध्यक्ष भाग्यवंत वाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.