सोशल मिडियाच्या माध्यमातून स्कूलला भरीव निधी

वेंगुर्ला,दि.१३ मार्च

सोशल मीडियाचा विधायक कामासाठीही उपयोग होऊ शकतो, याचा अनेकदा प्रत्यय येतो. शालेय जीवनात मित्र-मैत्रिणीसह ज्या शाळेत शिक्षणाचा पाया रचला आणि स्वावलंबी झालो, त्या शाळेच्या विकासासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा या उदात्त हेतूने व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून २५ वर्षाने एकत्र आलेल्या दाभोली इंग्लिश स्कूलच्या १९८७-८८ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला गरज असलेल्या स्मार्ट डिजीटल बोर्डसाठी म्हणून ५५ हजार रूपयांचा निधी मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर यांच्याकडे सुपूर्द करीत विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
यासाठी मेघःश्याम बोवलेकर, मंगेश मयेकर, रूपेश बोवलेकर, सुदाम तांडेल, गुरूप्रसाद दाभोलकर, मालिनी शिरगांवकर, दत्ताराम भगत, लालन खडपकर, कल्पना पेडणेकर, विवेक खानोलकर, जगन्नाथ दाभोलकर, सुचिता दाभोलकर, किरण शिरोडकर, प्रशांत दाभोलकर, मनिष पाटील, सुरेखा दाभोलकर, संगिता माडकर, महेश गावडे, सुवर्णा पेडणेकर, राजू खोबरेकर, संदिप सामंत, शैलेश गोवेकर, सुहास मयेकर, नारायण पवार, महादेव कांदळकर, वासुदेव राऊत, संदिप खानोलकर या माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.