वेंगुर्ला,दि.१३ मार्च
आडेली येथील ब्राईट बिगिनींग प्रि स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन नुकताच संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विवभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, आडेली तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत धर्णे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत ठाकूर, यशवंत परब, माजी ग्रा.पं.सदस्य प्रशांत मुंडये, शाम नाईक, देवस्थान मानकरी सचिन धर्णे, आडेली शाळा व्यवस्थापन कमिटी उपाध्यक्ष उदय आडेलकर, ग्रामस्थ रवि नाईक, गोरक्षनाथ धर्णे, विनोद कुडाळकर, राजेश गवळी, वैभव वाडकर, भगवान नवार, तुषार कांबळी, मुख्याध्यापिका भक्ती नवार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. शहरात जाऊन शिक्षण घेणे सर्वांना शक्य होत नाही म्हणून आडेली गावात भक्ती नवार यांनी एक शैक्षणिक झरा सुरू करून दिला त्याबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक केले. त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी विशेष आकर्षण म्हणून प्रेक्षकांना लकी ड्राॅ ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मर्ये, प्रास्ताविका भक्ती नवार व आभार स्वरा कोटीमकर यांनी मानले.