वेंगुर्ला,दि.१३ मार्च
निकॉम कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रशांत निकम यांनी एमकेसिएल अंतर्गत अणसूर पाल हायस्कूलमधील दहावी बारावीतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे जॉब ओरिएंटेड क्लिक कोर्सेस, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन केले.
तेजस्वी धुरी यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोपयोगी मोबाईल प्लिकेशन सायबर सिक्युरिटी विषयक माहिती दिली. तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास व करिअर मार्गदर्शन माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली. तसेच सिधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व एमकेसिएल सिधुदुर्ग आयोजित सायबर सुरक्षा सप्ताह प्रश्नमंजूषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी तर आभार शिक्षिका चारूता परब यांनी मानले.