जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस निरीक्षक वृषाली बरगे यांचा सत्कार

माऊली मित्र मंडळाचे वतीने कणकवली पोलीस ठाण्यातील नारीशक्तीचा सन्मान

कणकवली दि.१३ मार्च(भगवान लोके)

“जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून माऊली मित्र मंडळाचे वतीने, कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.तसेच कणकवली पोलीस ठाण्यातील नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक एस.एच. तडवी , सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ ,पोलीस पांडुरंग पांढरे, किरण मेथे, विनोद सुपल, श्री.कोलते, श्री.जाधव , कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता माने, पोलीस नाईक उज्वला मांजरेकर, पोलीस प्रणाली जाधव, तृप्ती कुळये,महिला होमगार्ड जयश्री कट्टीमणी उपस्थित होत्या.अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम सईद नाईक प्रसाद पाताडे प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक बाबुराव घाडीगावकर हेमंत नाडकर्णी विशाल रजपूत आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.