मालवणात एसटी कर्मचाऱ्यांसाठी १७ रोजी आरोग्य शिबीर

मालवण,दि.१४ जानेवारी

रोटरी क्लब मालवण आणि आय. एम. ए. मालवण यांच्या सहकार्याने एस. टी. आगार मालवणच्या चालक, वाहक तसेच अन्य कर्मचारी यांच्यासाठी बुधवार दि. १७ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत यावेळेत लिमये हॉस्पिटल मालवण येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी याचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब मालवण तर्फे करण्यात आले आहे.