देवगड,दि.१३ मार्च
कै. निर्मलाबाई पुरुषोत्तम दीक्षित यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त दीक्षित फाउंडेशन आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा पडेल न.१ येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.* यावेळी सिंधु रक्तमित्रचे जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, देवगड तालुका उपाध्यक्ष प्रवीण जोग,तालुका सचिव प्रकाश जाधव ता.सदस्य अंकुश ठुकरुल,सरपंच भूषण पोकळे,माजी सरपंच संजय मुळम,सुभाष घाडी,तंटामुक्ती अध्यक्ष वैभव वारिक,माजी मुख्याध्यापक दिलीप कुमार फडके व दीक्षित फाउंडेशनचे प्रतिनिधी सुरेश देवळेकर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका श्रीमती पाळेकर ,माजी सरपंच विकास दिक्षित,प्रमोद कुळकर, केशव मुळम,पडेल ग्राम सुधारणा मंडळ कार्याध्यक्ष संदीप तनवडे आदी उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. सिंधु रक्तमित्र चे तालुका अध्यक्ष हिराचंद तानवडे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले. *शिबिर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले ते सहकारी,पडेल ग्रामस्थ आणि रक्तदाते सर्वांचे सिंधु रक्तमित्र देवगड तर्फे खूप खूप आभार*मानण्यात..आले