भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 20 उमेदवार घोषित

नवी दिल्ली,दि.१३ मार्च

नवी दिल्ली महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.