दुरदृष्यप्रणालीव्दारे साधला लाभार्थ्यांशी संवाद
1 लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड वाटप
1 लाख सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा किटचे वाटप
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ मार्च
समाजातील वंचित घटकांचा विकास करणे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र शासन नेहमी कल्याणकारी योजना राबवित असते. पीएम-सुरज हे पोर्टलमुळे वंचित घटाकांमध्ये सामाजिक परिवर्तन घडून येणार आहे. या उपक्रमांतर्गत गरजूंना कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याने अनेक नवउद्योजक स्वत:चा व्यवसाय उभा करु शकणार आहेत. आयुष्मान आरेाग्य कार्डामुळे लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. केंद्र शासन 80 करोड लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण करत आहे. केंद्रातर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असून केंद्र शासन वंचित घटकाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-सुरज राष्ट्रीय पोर्टलचा दुरदृष्यप्रणालीव्दारे शुभारंभ पार पडला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 1 लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड वाटप आणि 1 लाख सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा किटचे वाटप देखील करण्यात आले.
या उपक्रमाच्या थेट प्रसारणाची व्यवस्था जिल्हा नियेाजन सभागृहात करण्यात आलेली होती. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपजिल्हाधिकारी श्री मठपती, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, विनायक ठाकुर, समाज कल्याण सहायक आयुक्त श्री चिकणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री मेश्राम, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही. लोहकरे, नगर पालिका प्रशासनाचे अरविंद नातु आदी उपस्थित होते.