आम्हाला गर्व हिंदुत्वाचा व्हॉट्स अॅप ग्रुपने दिव्यांगाला थाटून दिले स्टेशनरीचे दुकान
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वसई, दि.९ मे
आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्स अॅप ग्रुपने सोलापूर जिल्ह्यातील एका दिव्यांगाला स्टेशनरीचे दुकान थाटून देऊन सामाजिक जबाबदारी बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले.
हिंदुहृयदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारणाचे तत्त्व दिले. ते शिरोधार्य मानून आम्हाला गर्व हिंदुत्वाचाहा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आला. पण हा ग्रुप गुड मॉर्निंगसारखे शुभेच्छा संदेश देण्यासाठी न वापरता केवळ विधायक कामासाठीच वापरायचा, असा निर्धार करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक या ग्रुपचे सदस्य आहेत. वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक हेही या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ग्रुपकडून माणुसकी जपत सतत कार्य चालू आहे. शक्य होईल ती मदत सर्व सदस्य करत असतात. सर्व शिवसैनिक मिळून एखाद्याला आधार देण्याचे काम या ग्रुपच्या माध्यमातून करतात.
याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून दारफळ (सिना, ता. माढा, जि. सोलापूर) येथील दिव्यांग शिवसैनिक प्रमोद विद्यागज यांना आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या सहकार्याने स्टेशनरीचे दुकान सुरू करून देण्यात आले. त्यामुळे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निकालात निघाला आहे. ग्रुपच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रुपचा हा चौदावा उपक्रम होता.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना सोलापूर उपजिल्हा प्रमुख सौ.आशाताई टोणपे, माढा शहरप्रमुख शंभू साठे, दारफळ पोलीस पाटील हौसाजी पाटील, उपसरपंच जयबापू बारबोलेस ग्रुप कमिटी सदस्य संस्थापक, संचालक संतोष पाटील, अध्यक्ष वसंत सोनावणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय घुले, बाळासाहेब निकम, सेक्रेटरी अनिल कांबळे, उपसेक्रेटरी लवेश म्हात्रे, कार्यालय प्रमुख रंजित नरवणकर, उपकार्यालय प्रमुख सौ. समिता बागकर, उपखजिनदार महेंद्र गुरव, सौ. वासंती गोताड, सल्लागार कृष्णा मुणगेकर,सुरेश वाडकर, मार्गदर्शक अजय चिपळूणकर, किशोर मोरे* इत्यादी पदाधिकारी आणि ग्रुपमधील इतर सदस्य उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
div class="td-all-devices">