कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर!

div class="td-all-devices">

 सन 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी 74 पुरस्कार्थींची निवड
– पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात 12 जून रोजी पुरस्कार वितरण

ठाणे,दि.२९ मे

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’तर्फे वाङ्मयीन तसेच वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांच्या मानकऱ्यांची घोषणा शनिवारी, 28 मे 2022 रोजी करण्यात आली. यावेळी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि पालघर येथे होणाऱ्या महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे या उपस्थित होत्या. कोमसापकडून गेल्या तीन वर्षांतील 74 पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे.

11 व 12 जून रोजी पालघर येथे होणाऱ्या कोमसापच्या सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभावेळी विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचा वितरणसोहळा संपन्न होईल.

मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड प्रयत्नशील असणाऱ्या कोमसापकडून गेल्या 25 वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. परंतु कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत या पुरस्कारांचे वितरण शक्य झाले नाही. त्यामुळे आता कोरोनाचा झाकोळ दूर झाल्यानंतर कोमसापकडून सन 2018-19, 2019-20 आणि 2020-21 अशा गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात कादंबरी, कथा, कविता, चरित्रपर, ललित, समीक्षा, वैचारिक, बालवाङ्मय आदी साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींद्वारे तसेच वाङ्मयीन व्यवहार, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कृतिशील योगदान देणाऱ्या तब्बल 74 पुरस्कार्थींचा समावेश आहे. प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार्थींची निवड केली आहे.

कोमसापने 11 व 12 जून 2022 रोजी पालघर येथे प्रसिद्ध लेखिका-संपादक मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या उपस्थित राहणार असून राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत. या संमेलनाच्या समारोप समारंभावेळी, 12 जून रोजी विशेष कार्यक्रमात वरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड आणि ज्येष्ठ कवयित्री-लेखिका नीरजा या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या विशेष अतिथी असून कोमसापचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष मोनिका गजेंद्रगडकर, स्वागताध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल, अशी माहिती कोमसापचे प्रसिद्धी प्रमुख जयु भाटकर यांनी दिली.

………………………..

तिन्ही वर्षांचे पुरस्कार आणि पुरस्कार्थींची यादी खाली जोडत आहोत…

‘कोमसाप’ पुरस्कार : सन 2018-2019
वाङ्मयीन पुरस्कार-
(1) र. वा. दिघे स्मृती पुरस्कार : डॉ. गिरीश जाखोटिया (कादंबरी – ‘बदल’)
(2) वि. वा. हडप स्मृती पुरस्कार : दत्ता पवार (कादंबरी- ‘लोकशाहीतील राजे’)
(3) वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार : विलास गावडे (कथासंग्रह – ‘तारेवरच्या कसरती’)
(4) विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार : विजय खाडीलकर (कथासंग्रह- ‘नुक्कड’)
(5) आरती प्रभू स्मृती पुरस्कार : घनःश्याम बोरकर (कविता- ‘खेळीया’)
(6) वसंत सावंत स्मृती पुरस्कार : नामदेव गवळी (कविता- ‘भातालय’)
(7) धनंजय कीर स्मृती पुरस्कार : एम. पी. तथा मधु पाटील (चरित्र/आत्मचरित्र- ‘खारजमीनीतील रोप’)
(8) श्रीकांत शेटये स्मृती पुरस्कार : अशोक समेळ (चरित्र/आत्मचरित्र- ‘स्वगत’)
(9) प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार : विवेक गोविलकर (समीक्षा- ‘ग्रंथसागरु येव्हडा’)
(10) अनंत काणेकर स्मृती पुरस्कार : प्रतिभा सराफ (ललितगद्य- ‘सहज संवाद’)
(11) सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गंवादे पुरस्कार : सुवर्णा जाधव (ललितगद्य- ‘रंग जीवनाचे’)
(12) प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार : एकनाथ आव्हाड (बालवाङ्मय- ‘मिसाईल मॅन’)
(13) वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार : समिर झांटये (संकीर्ण- ‘बुद्धायन आणि इतर प्रवास’)
(14) अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार : सुभाष भडभडे (संकीर्ण- ‘अंतरंग’)
(15) फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार : डॉ. विद्या जोशी (वैचारिक- ‘वृद्धत्वाची ऐशीतैशी’)
(16) कोमसापचे विशेष पुरस्कार : उदय आत्माराम संख्ये (संपादित- ‘शिवप्रताप दिन’), यशवंत कदम (कथासंग्रह- ‘गडगीचा डोह’), उषा परब (कादंबरी- ‘कुसवा’)
वाङ्मयेतर पुरस्कार-
(1) कविता राजधानी पुरस्कार : प्रज्ञा दया पवार (महाराष्ट्र स्तरावरील कवीला देण्यात येणारा सन्मानाचा पुरस्कार)
(2) कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार : डॉ. देवराव हिराजी पाटील, चिंचणी, जि. पालघर (साहित्य, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत योगदान देत असलेल्या ठाणे किंवा पालघर जिल्ह्यातील मान्यवरांस)
(3) श्री. बा. कारखानीस पुरस्कार : डॉ. उदयकुमार पाध्ये, डोंबिवली, जि. ठाणे (साहित्य, पर्यावरण, शिक्षण- विशेषतः शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या कोकणातील मान्यवर व्यक्ती)
(4) गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे, दादर शाखा
(5) राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार : लता गुठे, मुंबई
(6) वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार : कोमसाप मालवण शाखा
(7) सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार (ग्रामीण भागातील स्त्री-लेखकासाठी) : संध्या शिवराम तांबे, सिंधुदूर्ग (‘पालवी फुटेली स्वप्ने’)
(8) सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार (महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थीनीसाठी) : श्रद्धा लक्ष्मण हळदणकर, रत्नागिरी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
(9) कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार (उमेदीच्या गुणवंत कवीस) : अमृत पाटील, नवी मुंबई
(10) कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार (कोमसापच्या युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यास) : आकाश नलावडे

कोमसाप पुरस्कार : सन 2019-2020
वाङ्मयीन पुरस्कार-
(1) र. वा. दिघे स्मृती पुरस्कार : चित्रा अविनाश नानिवडेकर (कादंबरी – ‘अंतरीच्या गुढगर्भी’)
(2) वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार : विलास गावडे (कथासंग्रह – ‘अनुभवाची शिदोरी’)
(3) विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार : प्रभाकर प्र. पाटील (कथासंग्रह- ‘ती’)
(4) आरती प्रभू स्मृती पुरस्कार : रेश्मा राणे-जाधव (कविता- ‘ओंजळ’)
(5) वसंत सावंत स्मृती पुरस्कार : सुजाता राऊत (कविता- ‘उगमाकडे जाताना’)
(6) धनंजय कीर स्मृती पुरस्कार : रवींद्र माहीमकर (चरित्र/आत्मचरित्र- ‘द्रष्टा कर्मयोगी’)
(7) श्रीकांत शेटये स्मृती पुरस्कार : चंद्रकांत गावस (चरित्र/आत्मचरित्र- ‘ते दिवस असे होते’)
(8) अनंत काणेकर स्मृती पुरस्कार : प्रशांत पाटील (ललितगद्य- ‘आगरी भाषेतील पारंपारिक गीते’)
(9) सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गंवादे पुरस्कार : अनुराधा नेसरकर (ललितगद्य- ‘सलणारा सलाम’)
(10) प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार : रमेश तांबे (बालवाङ्मय- ‘रंजक मराठी’)
(11) वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार : प्रियंवदा करंडे (संकीर्ण- ‘मुलाखती कालच्या-आजच्या’)
(12) अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार : रेमंड मच्याडो (संकीर्ण- ‘चला पवित्र भूमीच्या तीर्थयात्रेला’)
(13) कोमसापचे विशेष पुरस्कार : कमल पु. बावडेकर (संपादित- ‘कमल पुष्प’)
वाङ्मयेतर पुरस्कार-
(1) कविता राजधानी पुरस्कार : नीरजा महाराष्ट्र स्तरावरील कवीला देण्यात येणारा सन्मानाचा पुरस्कार)
(2) कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार : डॉ. नितिन आरेकर, अंबरनाथ (साहित्य, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत योगदान देत असलेल्या ठाणे किंवा पालघर जिल्ह्यातील मान्यवरांस)
(3) श्री. बा. कारखानीस पुरस्कार : डॉ. विद्याधर आत्माराम वालावलकर, ठाणे (साहित्य, पर्यावरण, शिक्षण- विशेषतः शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या कोकणातील मान्यवर व्यक्ती)
(4) गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार : मंदार टिल्लू, ठाणे
(5) राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार : वृंदा कांबळी, वेंगुर्ले
(6) वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार : कोमसाप महाड शाखा
(7) सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार (ग्रामीण भागातील स्त्री-लेखकासाठी) : दमयंती भोईर, नवी मुंबई
(8) सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार (महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थीनीसाठी) : वृद्धी संदीप भगत, रोहा
(9) कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार (उमेदीच्या गुणवंत कवीस) : संकेत म्हात्रे, ठाणे
(10) कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार (कोमसापच्या युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यास) : वैभव पाडावे

कोमसाप पुरस्कार : सन 2020-2021
वाङ्मयीन पुरस्कार-
(1) र. वा. दिघे स्मृती पुरस्कार : अविनाश बापट (कादंबरी – ‘खालाटी वलाटी’)
(2) वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार : संपदा पाटगावकर (कथासंग्रह – ‘तर्पण’)
(3) विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार : विजय खाडीलकर (कथासंग्रह- ‘कन्फेशन’)
(4) आरती प्रभू स्मृती पुरस्कार : रामदास खरे (कविता- ‘आता अटळ आहे’)
(5) वसंत सावंत स्मृती पुरस्कार : चेतना बेडेकर (कविता- ‘गावय’)
(6) धनंजय कीर स्मृती पुरस्कार : प्रतिभा बिस्वास (चरित्र/आत्मचरित्र- ‘पोलीस नभोमंडळातील 21 आयपीएस नक्षत्रं’)
(7) श्रीकांत शेटये स्मृती पुरस्कार : सुधीर मोंडकर (चरित्र/आत्मचरित्र- ‘भारताचा राजरत्न मनोहर पर्रिकर’)
(8) अनंत काणेकर स्मृती पुरस्कार : एल. बी. पाटील (ललितगद्य- ‘पीएम मोदींना न पाठविलेली पत्रे’)
(9) सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गंवादे पुरस्कार : विनोद पितळे (ललितगद्य- ‘काहीचिया बाही’)
(10) प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार : एकनाथ आव्हाड (बालवाङ्मय- ‘शब्दाची नवलाई’)
(11) वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार : मेघना साने (संकीर्ण- ‘पुस्तकांवर बोलू काही…’)
(12) अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार : माधवराव शहापुरे (संकीर्ण- ‘टवाळखोरी’)
(13) फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार : डॉ. आशुतोष रारावीकर (वैचारिक- ‘यशपुष्प’)

वाङ्मयेतर पुरस्कार-
(1) कविता राजधानी पुरस्कार : अजय कांडर (महाराष्ट्र स्तरावरील कवीला देण्यात येणारा सन्मानाचा पुरस्कार)
(2) कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार : डॉ. हेमंत प्रकाश राजोपाध्ये, खोपोली (साहित्य, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत योगदान देत असलेल्या ठाणे किंवा पालघर जिल्ह्यातील मान्यवरांस)
(3) श्री. बा. कारखानीस पुरस्कार : सतिश कामत, संगमेश्वर (साहित्य, पर्यावरण, शिक्षण- विशेषतः शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या कोकणातील मान्यवर व्यक्ती)
(4) गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार : किरण येले, अंबरनाथ
(5) राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार : स्मिता पाटील, केळवे
(6) वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार : कोमसाप दादर शाखा, मुंबई
(7) सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार (ग्रामीण भागातील स्त्री-लेखकासाठी) : वृषाली मगदूम, नेरुळ
(8) सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार (महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थीनीसाठी) : वैभवी भट, डहाणू
(9) कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार (उमेदीच्या गुणवंत कवीस) : उमेश जाधव
(10) कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार (कोमसापच्या युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यास) : मयुर तावडे

div class="td-all-devices">
div class="td-all-devices">
div class="td-all-devices">