पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री देव पाटेकर, आत्मेश्वर चरणी भाविक लीन

सावंतवाडी, दि.१ ऑगस्ट

कोरोना निर्बंधांमुळे श्रावणी सोमवारी भाविकांच श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू देवस्थान श्री देव पाटेकर, श्री आतमेश्वराच दर्शन घेताना निर्बंधाच बंधन होते. मात्र, यंदा बंधन नसल्यानं जिल्ह्यासह गोव्यातील भक्तगण सावंतवाडीत दाखल झालेले पाहायला मिळाले. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री देव पाटेकर, आत्मेश्वर चरणी ते लीन झाले.
सावंतवाडी संस्थानचे दैवत श्री देव पाटेकर देवस्थानात राजघराण्याच्या उपस्थितीत पहाटे पुजा, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडले. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दरवर्षी प्रमाणे जिल्ह्यासह गोवा राज्यातील भाविक दर्शनासाठी सावंतवाडी दाखल झाले होते. ४०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्वयंभू श्री पाटेश्वर चरणी भाविक नतमस्तक झाले.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व दोन शिवलिंग असणाऱ्या एकमेव आत्मेश्वर मंदीरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तिसरे खेम सावंत भोंसले यांच्या काळात ह्या मंदीराची स्थापना झाली असून आत्मेश्वर आणि प्राणेश्वर अशी दोन शिवलिंग गाभाऱ्यात आहेत‌. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या आत्मेश्वर चरणी शेकडो भाविक नतमस्तक झाले. श्रावणी सोमवार निमित्त धार्मिक कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आले होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा