स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्ताने नांदगाव येथील मोरजकर ट्रस्ट तर्फे आगळावेगळा उपक्रम

2 ऑगस्ट पासून उपक्रमाला सुरुवात

कणकवली दि.१ ऑगस्ट(भगवान लोके)

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्ताने नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट ने एक वेगळा उपक्रम हाती घेतला असून नांदगाव येथील कलाकारांना शासनाच्या माध्यमातून पेन्शन योजना मिळण्यासाठी आवश्यक माहिती तसेच कलाकार क्षेत्रातील भजन बुवा असलेल्या त्या व्यक्तीपर्यंत जात त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाईल व त्यावेळी त्यांनी आपल्यातील कलागुण सादर करणे आवश्यक आहे व त्यानंतर त्या भजनी कलाकार यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 4.30 वा. नांदगाव मधली वाडी येथील प्रसिद्ध भजनी महीला बुवा सौ. पल्लवी पांडुरंग म्हसकर यांच्या पासून होणार त्यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच यावेळी ट्रस्टच्या वतीने शासन स्तरावर वय वर्षे ५० वरील कलाकारांना पेन्शनसाठी अर्जांचे वाटप करण्यात येणार आहेत
या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन किशोर मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा