सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमाला आयोगाची स्थगिती

पुन्हा जिल्हा परिषद ५० व पंचायत समिती १०० प्रभाग होणार?;आरक्षण सोडतही पुन्हा नव्याने होणार

कणकवली दि.५ ऑगस्ट(भगवान लोके)

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून ५ ऑगस्ट २०२२ स्थगित केली.त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषद ५० व पंचायत समिती १०० प्रभाग होणार हे निश्चित आहे.तसेच आरक्षण सोडतही पुन्हा नव्याने होणार असल्यानं इच्छुकांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे.सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना आणि आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्‍य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा