विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण दाखवण्याची संधी अशा कार्यक्रमांतून मिळते-पी.सी.हळदवणेकर

वैभववाडी, दि.५ ऑगस्ट 

विदयार्थ्यांच्या अंगी असलेल्या जन्मजात चांगल्या गुणांची मशागत या कार्यक्रमातून होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण दाखवण्याची संधी अशा कार्यक्रमांतून मिळत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सकारात्मक गुण निश्चित त्याचे जीवन बदलवत असतात.सर्व समाज उभ करण्याची ताकद कलेत आहे. कलेकडे व्यावसायिकतेने पाहिले पाहिजे. शिक्षण घेत असताना 90% गुण मिळविलेला विद्यार्थी स्वयंसिद्ध असू शकत नाही. ज्याच्या अंगी कला आहे तोच खरा स्वयंसिद्ध विदयार्थी आहे. असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डाॕ.पी.सी.हळदवणेकर ( आधिष्ठता उदयानविदया महाविदयालय मुळदे)यांनी केले.
कृषी महाविदयालय सांगुळवाडी येथे आयोजित आंतर महाविदयालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव मयुरपंख २०२२ या महोत्सवाच्या उद्दघाटन प्रसंगी हळदणकर बोलत होते. कोकणातील २८ महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्गंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कोकणातील २८ महाविद्यालयातील १ हजारहुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, समुह गायन, ताल वाद्य, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, प्रश्न मंजुषा, भाषण, वादविवाद स्पर्धा, नाटक, मुकनाट्य, नक्कल, मुक अभिनय, चित्रकला, माती काम, व्यंगचित्र, रांगोळी, छायाचित्रे आदी विषयांची स्पर्धा होणार आहे. दापोली कृषी विद्यापीठ संचालक डॉ. विजय नाईक, एन. ए. वागळे, सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी, संस्थेच संचालक संदीप पाटील, सांगुळवाडी सरपंच गौरी रावराणे, माजी सरपंच प्रकाश पाटील संस्था सचिव सुधाकर येवले व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक संदीप पाटील म्हणाले, शिक्षण म्हणजे सर्वस्व नाही. त्याला कलेची जोड असली पाहीजे. कलेकडे व्यवसायीक दृष्टीने पाहीले पाहीजे. विद्यापीठाच्या सहकार्यामुळेच आम्ही हा मयूरपंख महोत्सव राबविण्याचे धाडस केले आहे. कोकणातील 28 महाविद्यालयातील विद्यार्थी यांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. झोरे यांनी तर आभार प्राचार्य पाटील यांनी मानले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा