सुकळवाड येथून तरुण बेपत्ता

मालवण ,दि.५ ऑगस्ट 

मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील प्रवीण गणपत पाताडे (वय ४५) हे दि. ३१ जुलै पासून बेपत्ता झाले आहेत. बाजारात जातो असे सांगून निघून गेलेले प्रवीण हे घरी परतले नाहीत. सर्वत्र शोध घेऊनही प्रवीण हे सापडून आले नाही. या प्रकरणी प्रवीण यांचा भाऊ विजय पाताडे यांनी ४ ऑगस्ट रोजी मालवण पोलीस ठाण्यात प्रवीण पाताडे हे बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण, कट्टा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा