जिल्हा नाभिक महामंडळाची ८ रोजी मालवणात बैठक

मालवण, दि.५ ऑगस्ट 

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेची बैठक ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण बाजारपेठ येथील भैरीभवानी मंदिर (संतसेना मार्ग) येथे आयोजित केली आहे. यावेळी प्रदेश पदाधिकारी विजय सीताराम चव्हाण, राजन पवार, अनिल अणावकर, प्रतिभा चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा कमिटी सदस्य, तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार उपस्थित राहणार आहेत. संतसेना महाराज पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा होणार आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संघटनेने केले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा