सेवांगणमध्ये “गोष्टी सांगेन गमतीच्या चार” कार्यक्रम संपन्न

मालवण, दि.५ ऑगस्ट 

बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अमृतमहोत्सववानिमित्त आणि कथामालेच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून ‘गोष्टी सांगेन गमतीच्या चार’ (कथाकथन तंत्र आणि मंत्र) हा कार्यक्रम सेवांगण संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात संपन्न झाला. यावेळी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी मालवण येथील लक्ष्मीबाई देसाई टोपीवाला कन्याशाळा मधील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना कथांचे विविध प्रकार सांगून कथांचे सादरीकरण कशा पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिका सहित करून दाखविले.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश ठाकूर यांनी गीतकथा, तालकथा, प्राणीकथा, नीतिकथा, बोधकथा, चातुर्य कथा सृष्टीकथा ,धर्म कथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा कल्पनारंजित कथा, परीकथा , चरित्र कथा,साहसकथा याविषयी मार्गदर्शन केले. कथा सांगताना कोणती तंत्र वापरावी याचे मार्गदर्शन करताना कथेची निवड, श्रोत्यांचा सहभाग, आत्मविश्वास, अभिनय, तन्मयता, चित्रमयता, शब्दसंपदा आणि वेळेचे बंधन ही महत्त्वाची तंत्र वापरावी, असे सुरेश ठाकूर यांनी सांगितले.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले. यावेळी संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर,कन्याशाळेचे शिक्षक प्रविण साबळे, सौ.वैशाली चव्हाण, विद्यार्थीवर्ग, वाचक, सेवांगण कर्मचारी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा