इंद्रधनू – देवगड यांच्यावतीने व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने आयोजित…

div class="td-all-devices">

११ हजार १११ रुपयांच्या रोख बक्षिसाची दहिहंडी श्रीराम भटवाडी जामसंडे गोविंदा पथकाने फोडून विजयोत्सव साजरा केला

देवगड, दि.२० ऑगस्ट 

इंद्रधनू – देवगड (रजि.) यांच्यावतीने आयोजित व अनुसया कॉम्प्लेक्स व्यापारी यांच्या सहकार्याने देवगड शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स (मांजरेकर नाक्यानजीक ) येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडी उत्सवातील ११ हजार १११ रुपयांच्या रोख बक्षिसाची दहिहंडी श्रीराम भटवाडी गोविंदा पथक, जामसंडे या पथकाने फोडून विजयोत्सव साजरा केला. तत्पूर्वी, उत्सवामध्ये एकूण पाच पथकांनी सलामी देत रसिकांची मने जिंकली. यात शिवशक्ती महिला गोविंदा पथक (मुंबई- डोंबिवली), हनुमान प्रसन्न गोविंदा पथक (राजापूर – खडपेवाडी) यांच्यासह तालुक्यातील पथकांचा सहभाग होता.

व्यासपीठावर इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, एलेंटा अँग्रो कंपनीचे कोकण विभागीय व्यवस्थापक निवास पाटील, उद्योजक सुनील कुळकर्णी, सौ. शमा कुळकर्णी, देवगड व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शैलेश कदम, सुनील पारकर, विजय उर्फ भाई नाडणकर, संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, राजीव पडवळ, भावेश पटेल, आनंद रामाणे, वैभव केळकर, मिलिंद मोर्ये, यतीन कुळकर्णी, दिनेश पटेल, शंकर मुणगेकर, साईनाथ सुके यांच्यासह दयानंद पाटील, अनिकेत बांदिवडेकर, देवगड पोलीस स्थानकाचे प्रवीण सावंत, देवगड व्यापारी पर्यटन संस्थेचे संजय धुरी, सोहम पारकर आदी उपस्थित होते. उत्सवामध्ये सहा थरांची सलामी श्रीराम भटवाडी गोविंदा पथक जामसंडे व हनुमान प्रसन्न गोविंदा पथक राजापूर खडपेवाडी यांनी दिली. या दोन्ही पथकांना प्रत्येकी तीन हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले. पाच थरांची सलामी वाघोटन गोविंदा पथक, आझादनगर मित्रमंडळ गोविंदा पथक – जामसंडे, शिवशक्ती महिला गोविंदा पथक डोंबिवली- मुंबई यांनी दिली. या पथकांना दोन हजाराचे बक्षिस देण्यात आले.

रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीराम भटवाडी गोविंदा पथकाने दहिहंडी फोडण्यापूर्वी पुन्हा एकदा सलामी दिल्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रगीत म्हटले गेले. त्यानंतर श्रीराम भटवाडी गोविंदा पथकाने उत्सवातील ११ हजार १११ रुपयांच्या बक्षिसाची दहिहंडी फोडून विजयोत्सव साजरा केला. या उत्सवात अबालवृद्धांसह महिला प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.

दहिहंडी उत्सवानिमित्त सिंधुदुर्गात दाखल झालेल्या मुंबई- डोंबिवली येथील नामांकित शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने ‘इंद्रधनूच्या दहिहंडी उत्सवात सहभाग घेतला. दहिहंडीला सलामी देण्यापूर्वी या पथकातील महिलांनी नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. दहिहंडीचा उत्साह द्विगुणित करणारे हे नृत्य उपस्थितांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरांमधून कैद केले.

div class="td-all-devices">
div class="td-all-devices">
div class="td-all-devices">