तिवरे नुकसानग्रस्तांना ‘पंतप्रधान राहत कोष’ मधून आर्थिक सहाय्यता मिळावी

खास.विनायक राऊत यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे निवेदन सादर

नवी दिल्ली,ता.१०
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील तिवरे धरण दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ‘प्रधानमंत्री राहत कोष’ या योजनेतून आर्थिक सहकार्य करण्यात यावे, याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास. विनायक राऊत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोकण भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तीवरे धरण फुटले असता सात गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि यामध्ये जवळपास १५ ते २० घर आणि आत्तापर्यंत २४ जण बेपत्ता असल्याचे एन.डी.आर.एफ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे. तसेच आतापर्यंत २१ लोकांचे मृतदेह मिळाले असून यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे या तीवरे धरण दुर्घटनेप्रकरणी कित्येकांची घर उध्वस्त झाली आहे तसेच पाळीव प्राणी हे यात वाहून गेले असून शेतीसोबत रेल्वेरस्ते उखडले आहेत, मोठ्या प्रमाणात शेतीत पाणी शिरल्यामुळे शेतीचेही नुकसान झाले असून सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान या भागात झाले आहे.तरी सदर दुर्घटनेतील नुकसानग्रस्त कुटुंबांना ‘पंतप्रधान राहत कोष’ यातून आर्थिक सहाय्यता मिळावी असे या निवेदनात म्हटले आहे

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा