अखेर चांद्रयान २ अवकाशात झेपावलं

श्रीहरिकोटा,ता.२२
अखेर चांद्रयान-२ मोहीम दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावली गेली. श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागणार असून सदर यान २३ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे तसेच ६ सप्टेंबरला चंद्रावर दाखल होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे भारताच्या या एतीहासिक कामगिरीबद्दल सर्व स्तरातून इस्त्रोचे कौतुक होत आहे

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा