कोकण विभाग कृषी सहसंचालकांची मालवण तालुक्याला भेट

मालवण-प्रतिनिधी

कोकण विभागाचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी मालवण तालुक्याला भेट देत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण येथे तालुक्यातील सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची आढावा सभा घेतली. यावेळी त्यांनी चालू वर्षात फळ बाग लागवड योजनेविषयी झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी कृषी विभागाचे प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. म्हेत्रे, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी सी.जी. बागल, प्र. तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी, कृषी सहाय्यक धनंजय गावडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, गावच्या सरपंच श्रीमती वरवडेकर, ग्रा.पं. सदस्य विशाल धुरी, माजी सरपंच दिगंबर नके, नवतरुण शेतकरी मंडळाचे प्रवीण मराळ, नारायण नाईक, गीतांजली धुरी, नीलम नाईक, रुपेश नाईक, समीर परब, भिसाजी नाईक, श्री. करावडे आदी उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा