भारतात आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली-दि.१४ एप्रिल

भारतात आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.जे प्रदेश २० एप्रिलपर्यंत आळा घालतील इथले नियम शिथिल करण्यात येतील तसेच २० एप्रिल पर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केले जाणार आहे. सरकारकडून उद्या नवीन नियमावली करण्यात येणार आहे.तसेच गेल्या काळातल्या अनुभवातून आपण निवडलेला रस्ता योग्य आहे.भारतात वेळेत निर्णय घेतले नसते तर अनर्थ झाला असता आर्थिकदृष्ट्या महागात पडलं असले तरी लोकांचे जीवन वाचले सोशल डिस्टन्ससिंगचा लोकांना मोठा लाभ भारताला झाला कोणत्याही देशाशी तुला करणे सध्याच्या घडीला योग्य नाही तसेच अनेक देशांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला मात्र भारताच्या तुलनेत इतर देशात कोरोना चे केसेस ३० टक्के जास्त आहेत.समस्या दिसली तेव्हाच आपण समस्येवरचे उपाय योजले भारतात समस्या वाढण्याची प्रतीक्षा केली नाही असे देशाला संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

? *पंतप्रधान मोदींनी सांगितली सप्तपदी*

१. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या, ज्यांना आधीपासून आजार आहेत, त्यांच जास्त काळजी घ्या.
२. लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं पालन करा
३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा, पाणी यांचे सेवन करा.
४. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल अॅप डा
ऊनलोड करा.
५. शक्य असेल तितक्या गरीब कुटुंबांजी काळजी घ्या,
६. तुमचा व्यवसाय, उद्योग असेल तर संवेदना ठेवा नोकरीवरुन काढू नका.
७. देशातील करोना योद्धयांचा सन्मान करा, त्यांचा गौरव करा

? महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणांना मुकले आहे. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही.

? कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केलंय. या सगळ्या प्रयत्नांनंतरही करोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्यानं सगळ्यांना सतर्क केलं आहे.

? “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

? देशवासी एखाद्या योद्ध्याप्रमाणे कार्य करत आहेत. तुम्हाला किती त्रास होतो आहे याची मला कल्पना आहे. तुम्हीच भारताला वाचवलंय, मी सर्वांना नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा