“एस” विभागाच्या 14 प्रभागातील झोपडपट्टीत वेगाने पसरतोय कोरोना

भांडुप एस विभागातील 18 मे पर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 656

मुंबई-दि २० मे किशोर गावडे

महापालिका एस विभाग क्षेत्रातील प्रभागाच्या विभागानुसार कोरोनाने शिरकाव केला असून, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बहुतांशी झोपडपट्टी परिसरात कोरोना वेगाने पाय पसरतोय. एस विभागाच्या प्रभागावार हद्दीत कोरोनाने प्रवेश करून, समस्त भांडुपकरांची चिंता वाढवली आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्याही वाढत आहे. विक्रोळी सुर्यनगर, कन्नमवार नगर, हरियाली व्हिलेज, टागोर नगर, कांजूरमार्ग पूर्व तर भांडुप पश्चिम येथील टेबेपाडा,भट्टीपाडा, गावदेवी, रावते कंपाऊंड, जमिल नगर, सर्वोदय नगर,तूळशेत पाडा, या विभागात दररोज तीन ते चार रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. भांडुप मधील कोरोना बाधित एकही प्रभाग कोरोणा पासून मुक्त राहू शकलेला नाही. भांडुप पश्चिम विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज विविध भागात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. कोरोना बाधित रुग्ण संख्याबळ 822 च्या पुढे गेल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून सांगण्यात येते. कोंरानाचे रुग्ण वाढले जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा