कोरोनाच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई-दि २४ मे

होळीनंतरचे सगळे सण आपण शिस्तबद्ध पद्धतीने साजरे केले आपण सर्वांना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत तरी ईद साजरी करत असताना घरात बसून साजरी करा तसेच कोरोनासोबत जगायचं म्हणजे काय करायचं हे शिकावं लागेल मात्र सरकारची सुरुवात झाली आणि कोरोनाचं संकट आले कोरोनाच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही. आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले तुम्ही शिस्त पाळल्यानेच आकडे आटोक्यात आले आहेत तसेच मेच्या अखेरीस राज्यात दीड लाख रुग्ण असतील असा अंदाज होता मात्र पण प्रत्यक्षात आज राज्यात ३६ हजार ७८० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ज्येष्ठ व्यक्ती ही कोरोनाशी लढून बरे होत असले तरी आता गुणाकार जीवघेणा होणार, केसेस वाढणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की तसेच आतापर्यंत राज्यात साडेतीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत अनेक नवजात बालकांना कोरोनाची लागण नाही आतापर्यंत राज्यात १ हजार ५७७ मृत्यू झाले आहेत. अनेक मैदानं सभागृहं आम्ही सज्ज ठेवली असली तरी मी अखेरीस तब्बल १४ हजार बेड उपलब्ध होतील तसेच जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड मिळावेत अशी व्यवस्था केली आहे राज्याला पुन्हा एकदा रक्तपुरवठ्याची गरज असली तरी ज्यांना रक्तदान करायचंय आहे त्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं. आगामी काळात राज्यावर पावसाचंही संकट येणार आहे पावसाळ्यात आणखी खबरदारी घ्यावी लागेल सर्व रोगराईंपासून लांब राहणं अत्यंत गरजेचे आहे मात्र इतर आजारांपासून लांब राहणे म्हणजे कोरोनाला टाळण्यासारखे आहे. ताप अंगावर काढू नका तातडीने डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्या हायरिस्क पेशंटना कोरोनाचा धोका अधिक असला तरी थोडी लक्षणं दिसली तरी डॉक्‍टरांना नक्की दाखवा सर्दी, खोकल्यापेक्षा ताप, थकवाही कोरोनाची लक्षणे आहेत अतिशय शेवटच्या टप्प्यात आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.

वेळेत दाखल झाल्यावर वेळीच उपचार झाले ते रुग्ण बरे झाले कोरोनाविरुद्धच्या युद्धातल्या सैनिकांना सलाम केलाच पाहिजे राज्यातल्या डॉक्टरांकडून सुरू असलेल्या संशोधनाला यश मिळत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाने कोरोनाशी प्रभावी लढा दिला असला तरी विशेषतः ग्रामीण भागात ही कोरोना विरुद्धची लढाई प्रभावी ठरत आहे. औषध वेळेत मिळणे गरजेचे पण रुग्ण वेळेत मिळाला पाहिजे. प्रभावी अंमलबजावणीमुळेच महाराष्ट्राचा आकडा नियंत्रणात आहे. फक्त पॅकेज देऊन भागणार नाही पोकळ घोषणा देत नाही रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य देण्याची योजना आखली आहे शिवभोजन योजनेतून रोज दहा लाख लोकांचं पोट भरतं आहे. लाखो मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न सरकारने मिटवला आहे मात्र पॅकेज देण्यापेक्षा अशा प्रभावी योजनांची राज्याला गरज असली तरी समाजाच्या प्रत्येक वर्गाला आपण दिलासा देत आहोत सरकारी रुग्णालयात १०० % मोफत उपचार दिला जात आहे. राज्याने आतापर्यंत ४८१ ट्रेन पाठवले असून सात ते आठ लाखांपर्यंत मजूर घरी गेलेत ट्रेनच्या भाड्यापोटी राज्याने ८५ कोटी दिले आहेत. आपण रोज ८० ट्रेनची मागणी करतोय पण प्रत्यक्षात मिळतायत ४०. एसटी प्रवास साठी ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत तसेच रेल्वे, जहाज, विमानमार्गे अनेक लोक महाराष्ट्रात आले आहे आम्हाला सर्व सुरळीत करायचंय पण कोरोनाला टाळून करायचं आहे ३ लाख ८० हजार मजूर परत पाठविण्याचे काम केले असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा