जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधीत.

सिंधुदुर्गनगरी-दि.२८ मे 

जिल्ह्यात आणखीन दोन रुग्ण कोरोना पोसिटीव्ह आढळल्याने आता कोरोना बधितांची संख्या १९ झाली आहे. यातील एक रुग्ण कणकवली तालुक्यातील असून तो कुडाळ तालुक्यातील

पणदूर येथील रुग्णाच्या सम्पर्कातील आहे. तर दुसरा वैभववाडी तालुक्यातील एक आहे. या दोघांचेही रिपोर्ट आज पॉजिटिव्ह आले आहेत. दोन्ही रुग्णांनी  मुंबई येथून प्रवास केला आहे. या दोन्ही व्यक्ती अलगीकरणात होत्या.

शनिवारी एकदम ८ रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा १६ वर पोचला होता. त्यानंतर सोमवारी पणदूर येथे ५२ वर्षीय महिला पोसिटीव्ह निघाली होती. दोन दिवसांच्या कालावधीत नंतर आज दोन रुग्ण पोसिटीव्ह निघाले. त्यामुळे हा आकडा १९ वर पोचला आहे. तर ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात ४५ हजाराहून चाकरमानी दाखल झाले आहेत. तर २०० पेक्षा जास्त रोपोर्ट अद्यापही येणे बाकी आहेत.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा