पठाणवाडी येथे दरड कोसळली, वसई नायगाव हायवे वर पाणीच पाणी

वसई नायगाव मालाड परिसरात रात्रभर कोसळतोय पाऊस

मुंबई-दि.०४ ऑगस्ट

कोकणासह मुंबई मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असून रस्त्यावर पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .वसई नायगाव हायवे वर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक धिमी झाली होती.रात्री पासूनच नालासोपारा वसई नायगाव मालाड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आज पहाटे पासून या पावसाने अधिकच जोर केल्याने वाहतूकिस अडथळे येत आहेत.यातच सकाळच्यावेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती .मालाड पुष्पा पार्क येथे दरड कोसळल्याने या ठिकाणची वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.या मुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला .आधिच कोरोना मुळे बेजार झालेल्या नागरिकांना या पावसामुळे पाणी भरेल की काय ही भीति देखिल वाटत आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा