ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड-१९ च्या संक्रमण काळामध्ये

0
69

 आभासी अध्यापन सुविधा उपलब्ध, सुरु झालेल्या या वर्गाचे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान

(RUSA) चे राज्य प्रकल्प संचालक पंकज कुमार (आय.ए.एस) यांच्या हस्ते उद्घाटन

तळेेेरे-दि.११ सष्टेंबर संजय खानविलकर

मुंबई विद्यापीठाचे तळेरे येथील, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे आणि डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे, के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली यांच्या सहकार्याने कोकण विभागातील शहरी, ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड-१९ च्या संक्रमण काळामध्ये आभासी अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सात सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या वर्गाचे उद्घाटन पंकज कुमार (आय.ए.एस),
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) चे राज्य प्रकल्प संचालक यांच्या हस्ते झाले.

दळवी महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून ज्ञानासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण व अर्थपूर्ण उपक्रम राबविले जातात.  कोविड-१९ च्या जागतिक महामारीत ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण सुसह्य  यावे, यासाठी दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनवर्गाची निर्मिती करण्यात आली.  या वर्गात अनुभवी तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत.  यात कला, विज्ञान व वाणिज्य या शाखा निहाय अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे लाइव्ह वर्ग असून यावर विद्यार्थ्यांना प्रश्न सुद्धा विचारता येणार आहेत.  दळवी महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर  नंतर सुद्धा हे वर्ग पाहता येणार आहेत.

आभासी श्रृंखलावर्गाच्या उद्घाटन प्रसंगी  राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) चे महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक श्री. पंकज कुमार (आय.ए.एस) म्हणाले की, “सध्याच्या महामारीच्या काळात  विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सुरू केलेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे, विनायक दळवी यांची कंसोर्शिअमची कल्पना ही काळाची गरज आहे”.
RUSA चे वरीष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाबरेकर, यांनी दळवी महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला.
डॉ.संजय जगताप,  सह-संचालक, उच्च शिक्षण विभाग अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, “ऑनलाइन पद्धतीचा वापर  करून विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल या तिन्ही महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीएसपी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई हे होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने करीत दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी विद्यार्थ्याचे मनोधैर्य वाढविले.
डॉ.अशोक साळुंखे समन्वयक विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अंबाडवे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ.जी.बी राजे मार्गनिर्देशक,
विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अंबाडवे
यांनी  प्राणीशास्त्राचे व्याख्यान दिले.
तर आभार प्रदर्शन ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक व डीएसपीएमचे सचिव डॉ.प्रशांत राव यांनी केले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा