भाजपा आ.नितेश राणेंच्या माध्यमातून कोविड कक्षाना ४५ स्टीम इनहेलर…!!

0
82

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी उपजिल्हा रुग्णालय, संजीवनी हॉस्पिटलमध्ये केले वाटप

कणकवली-दि.१९ सष्टेंबर (भगवान लोके)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावतीने कणकवली कोविड कक्षाला ४५ स्टीम इनहेलर देण्यात आले.त्याचे वाटप भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी कणकवली पदाधिकाऱ्यांनी कणकवली कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालय ३५व संजीवनी हॉस्पिटलमध्ये १० असे स्टीम इनहेलर ( वाफ घेण्याची मशीन) संच उपलब्ध प्रदान केले.उपजिल्हा रुग्णालयात डॉ. टाक व डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शहरअध्यक्ष अण्णा कोदे, सभापती संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, जावेद शेख,उदय आळवे, नंदू वाळके,संजय ठाकूर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा