सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे

यासाठी  मनगटावर काळ्या फिती लावून रक्तदान आंदोलन 

सावंतवाडी-दि.१ ऑक्टोबर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गात व्हावे यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रक्तदान आंदोलन पुकारले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे आता जिल्ह्यात रक्तदान आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. मनगटावर काळ्या फिती लावून हे आंदोलन केले. यावेळी अनेकांनी रक्तदान केले

ग्रामसभा, पंचायत समिती, नगरपालिका यांचे १३० ठराव, नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याना लिहिलेले २५ हजार पोस्ट कार्ड, उपोषणे तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली. या जनरेटयाला देखील शासनाकडून आवश्यक असा तत्पर प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्याची निकड लक्षात घेता सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे. म्हणूनच या मागणीसाठी जिल्ह्यातील युवकांनी सकारात्मक तसेच अभिनव असे रक्तदान आंदोलन करण्याचे योजले याची सुरुवात सावंतवाडी पासून करण्यात आली असून, पुढे जिल्हाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे, असे देव्या सूर्याजी यांनी सांगितले.

यावेळी सर्व रक्तदात्यानी आमच्या सकारात्मक आंदोलनाला शासन तातडीने सकारात्मकच प्रतिसाद देईल ही अपेक्षा व्यक्त केली. या आंदोलनाला युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून अनेक युवकांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे, असे रक्तदान आंदोलनाचे नेतृत्व देव्या सूर्याजी यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यात गेली अनेक वर्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी लढा देणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक अँड शामराव सावंत यांनी देखील आंदोलनात सहभागी रक्तदात्याचे आभार व्यक्त करून युवकांच्या सक्रिय सहभागामुळे शासन निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य विषयक समस्येतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा सिंधुदुर्ग तातडीने निर्माण करून सुटका करेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी लक्ष्मण नाईक व पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी देखील जो पर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग होत नाही तो पर्यंत हे आंदोलन जिल्हाभर सुरूच ठेवण्यात येईल. युवकांच्या या सकारात्मक आंदोलनास शासन अवश्य प्रतिसाद देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी गौतम माठेकर, रॉक डान्टस, पार्थिल माठेकर, अभी गवस, मेहर पडते, रोहित राऊळ, अर्चित पोकळे, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, दिग्विजय मुरगूड, आकाश सासोलकर, ओंकार आगोळकर, आदी उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा