नेमळे येथे पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्याला लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट अज्ञातांकडून चोरी

सावंतवाडी-दि.१७ ऑक्टोबर 

नेमळे येथे पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्याला लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट अज्ञातांकडून चोरी करण्यात आलेल्या आहेत. याबाबत पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांनी येथील पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली आहे. येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा चोरीचा प्रकार 8 दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे.

नेमळे येथील नदीवर लोखंडी प्लेट च्या साह्याने बंधारा घालून त्याचा वापर शेती बागायतीसाठी करण्यात येत असे जलसंजीवनी सहकारी पाणी वापर संस्थेचे उपाध्यक्ष हे या पाण्याचा वापर करीत असत पावसाळा आल्याने हा बंधारा काढून ठेवण्यात आला होता. बंधाऱ्याचे लोखंडी प्लेट या नदी शेजारील ठेवण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी फ्लॅट काढून ठेवण्यात आले होते त्याठिकाणी नाईक यांनी पाहणी केली असता घटनास्थळी प्लेट दिसून आल्या नाहीत या सर्व 35 प्लेट्सची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबतची माहिती त्यांनी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष महेश चव्हाण यांना दिली असता आज येथील पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेत याबाबत तक्रार दिली. याबाबत पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधित प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला. 30 ते 35 हजार एवढ्या किमतीत हा मुद्देमाल असून या प्लेटची चोरी आठ दिवसापूर्वी झाल्याचे समजते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा