सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमा कवच दिले आहे, त्या शेतीपीकांचे पंचनामे करा

 अन्यथा विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेना धडक देईल-रूपेश राऊळ

सावंतवाडी-दि.१७ ऑक्टोबर 

शेतकऱ्यांना कर्ज देताना बॅंका विमा कवच देत असतात,मात्र शेतीपीकाचे नुकसान झाले तेव्हा पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.ज्या विमा कंपन्यां शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करणार नाहीत,त्या कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना धडक देईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती कर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँक आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत विमा कवच दिले जाते मात्र अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असताना या विमा कंपनीनीने शेतीवर येऊन पंचनामे केले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत विमा कंपन्यांनी वेळीच खबरदारी घेतली नाही तर त्यांच्या दरवाजावर शिवसेना धडक देईल असे असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती आणि बागायती शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. शेती कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून कर्जातील शेती कर्जाचे विमा कवच देत आहेत विमा कंपन्यांचा विमा कंपन्या त्याच वेळी शेतकऱ्यांकडून पैसे गुंतवणूक करत असताना नुकसानीच्या वेळी मात्र विमा कंपन्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत, असे राऊळ यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे केले पाहिजेत अन्यथा संबंधित विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये शिवसेना धडक देईल असा इशारा रुपेश राऊळ यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि कृषी प्रशासनाने राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांचे विमा कवच असलेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे विमा कंपन्यांना करण्यासाठी आदेश द्यावेत आणि शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अन्यथा विमा कंपन्यांच्या विरोधात आंदोलन छेडेल असा इशारा तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा