न्यायालयाच्या आदेशानुसार देवगड पोलिसांनी महिलेला केले दागिने परत

सदर दागिने 1 लाख 30 हजार किमतीचे

देवगड-दि.१७ ऑक्टोबर

देवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 31 जुलै रोजी जबरदस्तीने महिलेला गाडीत घालून अंगावरील एक लाख तीस हजार किमतीचे दागिने चाकूचा धाक दाखवून संशयितांनी लुबाडले होते.सदर  दागिने  17 ऑक्टोंबर रोजी न्यायालयाच्या आदेशावरून सदर  दागिने  समक्ष पंचनामा करून शनिवारी तक्रारदार महिलेच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये जुने वापरातले दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र 20 ग्रॅम वजनाची जुनी वापरलेली चैन दोन दहा ग्रॅम वजनाच्या बांगड्या दोन कर्णफुले या दागिन्यांचा समावेश असून सुमारे एक लाख तीस हजार किमतीचा मुद्देमाल  महिलेला शनिवारी सायंकाळी महिला पोलीस नाईक रेखा कबले, पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली झेमने यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा